जागतीक दिव्यांग दिनानिमीत्य यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन

143

दिव्यांग बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती 

चंद्रपूर : जागतीक दिव्यांग दिनानिमीत्य यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या वतीने यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या शहर संघटीका वंदना हातगावकर, निलेश पाझारे, यंग चांदा ब्रिगेडच्या युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, मुन्ना खोब्रागडे, घूग्घूस विभाग प्रमूख विलास वनकर, कल्पना शिंदे, विमल काटकर, दुर्गा वैरागडे, अनिता झाडे, माधूरी बावणे, यांच्यासह दिव्यांग बांधवांची उपस्थिती होती.

दरवर्षी प्रमाणे यंदाही यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने दिव्यांग दिनानिमीत्य विविध उपक्रम राबविण्यात आले. या दरम्याण विविध दिव्यांग संस्थांना भेट देण्यात आली तर यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात दिव्यांग बांधवांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी हेलन केअर आणि सुधा चंद्रन आदिंच्या जिवन चरिद्रावर भर देवुन दिव्यांग बांधवांना प्रेरणा देणारे मार्गदर्शन करण्यात आले.