दुर्लक्षित क्रीडा संकुलनाला आमदार सुभाष धोटे यांची भेट , जाणून घेतल्या क्रीडा प्रेमीच्या समस्या !

0
127

राजुरा (चंद्रपूर) : राजुरा तालुक्यातील क्रीडा प्रेमी युवकांसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकणाऱ्या तालुका क्रीडा संकुल येथे आज आमदार सुभाष धोटे यांनी भेट देऊन पाहनी केली. या प्रसंगी त्यांनी खेळाडूच्या समस्या, क्रीडा संकुलाच्या समस्या तसेच क्रीडा संकुल नुतनीकरण करण्यासंदर्भात आढावा घेतला. अनेक वर्षांपासून राजुरा तालुक्यातील हे क्रीडा संकुल दुर्लक्षित आणि बकाल अवस्थेत आहे हे विशेष. येथे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यास तालुक्यातील क्रीडा प्रेमी युवकांना विविध खेळ प्रकारांना बळ मिळून क्षेत्रातील क्रीडा प्रेमींना अच्छे दिन पहायला मिळण्याची आशा आहे. या प्रसंगी आमदारांच्या हस्ते काही खेळाडूंचा सत्कार सुध्दा करण्यात आला. तसेच राजुरा तालुक्यातील क्रीडा संकुलात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार सुभाष धोटे यांनी आपल्या संबोधनात केले.
या प्रसंगी राजुराचे नगराध्यक्ष अरूण धोटे, कार्यकारी नगराध्यक्ष सुनिल देशपांडे, तहसीलदार हरिश गाडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष साईनाथ बतकमवार, नगरसेवक हरजितसिंग संधू , शहर अध्यक्ष अशोक राव, अॅड. चांदेकर, तालुका क्रीडा अधिकारी राजु वडसे, वास्तुशिल्प तज्ञ दिनेश नवनारे, पूर्वा खेरकर, मयुर खेरकर, योगीता भोयर, असद कूरेशी, पाशा शेख, श्री छत्रपती क्रीडा अकादमी चे विद्यार्थी यासह क्रीडा प्रेमी नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here