चालत्या वाहनाने घेतली पेट

345
चंद्रपूर:- घुगूस वरून चंद्रपूर कडे परत येत असताना चारचाकी वाहनाने शेणगाव फाट्याजवळ पेट घेतला, ही घटना काल रात्रौ 10:00 वाजताच्या सुमारास घडली असली तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
         मालवाहतूक करणारे हे वाहन क्रमांक एम एच 34 ए 8879 (MH 34 A 8879) वाहनचालक रामदास मोगरे यांनी घुगूस येथे वाहनात डीझल टाकल्यावर चंद्रपूरकडे परत येत होते मात्र शेणगाव फाट्याजवळ अचानक गाडीत स्पार्क झाल्याने धूर निघायला लागला वाहनात बसलेले तिन्ही व्यक्ती खाली उतरताच वाहनाने पेट घेतला.
   तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करून आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.