सरकारने पारीत केलेल्या शेतकरी विरोधी कायद्या विरोधत युवक काँग्रेसचे निवेदन

0
168

पाटण -: आकाश कागणे (ता.प्र.)

मागील 12दिवसापासुन देशातील शेतकरी दिल्ली येथे रस्त्यावर उतरुन विरोध करत आहे, सदर कायदे शेतकर्‍यांसाठी घातक आहे म्हणून देशातील शेतकरी यांनी सरकारला मागणी करत आहे कि हा कायदा रद्द करण्यात यावा तरी पण मोदी सरकारने देशातील पोशिंदा शेतकर्‍यांला न्याय देऊ शकत नाही हा शोकांतिका आहे देशातील अन्न दाता शेतकर्‍यांच्या विरोधात पारीत केलेले कायदा रद्द करण्यात यावा म्हणून जिवती तालुका युवक काँग्रेस, तालुका युवका काँग्रेस, महिला काँग्रेस, यांचे वतीने पारीत केलेले काळे कायदे रद्द करण्यासाठी तहसीलदार जिवती यांचा मार्फत महामाहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले यावेळी तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष गणपतजी आडे, तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष सितारामजी मडावी, नगराउपाध्यक्ष आशपाक शेख, माजी सभापती प्रा. सुग्रीव गोतावळे, महासचिव तथा उपसरपंच भिमराव पवार,तालुका सचिव गांजरे सर, मारोती कुमरे, रोहिदास आडे,लहुजी गोतावळे, सत्तरशाह कोटनाके, बंडुभाऊ राठोड, तसेच युवक काँग्रेसचे पदाधिकारी यांची उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here