राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा ‘भारत बंदला’ पाठींबा : डॉ. अशोक जिवतोडे

0
147

चंद्रपुर : दि. 8 डिसेंबरच्या राष्ट्रीय कृषी कायद्याविरोधात असलेल्या भारत बंद ला राष्ट्रीय ओबीसी महासंघाद्वारे पाठींबा जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रीय कृषी कायद्याविरोधात देशभरात वातावरण तापले आहे. ठीकठीकाणी आंदोलने होत आहेत. शेतकरी विरोधी कायदे रद्द व्हावे, याकरीता भारत बंद होत आहे.

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, राष्ट्रीय समन्वयक डॉ. अशोक जिवतोडे, महासचिव सचिन राजुरकर, बबनराव फंड, बबनराव वानखेडे, अनिल शिंदे, सुर्यकांत खनके, दिनेश चोखारे, यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष नितिन कुकडे, सचिव विजय मालेकर, कार्याध्यक्ष बबन राजुरकर, डॉ. संजय बरडे, संजय सपाटे, आल्हाद बहादे, कुणाल चहारे, जिल्हा महिला अध्यक्षा सौ. जोत्स्ना राजुरकर, सौ. शिंदे, सौ. मन्जुळा डुडुरे, इत्यादी पदाधिकारींनी भारत बंद ला पाठींबा देवून या आंदोलनात सहभागी होण्याचे सर्वांना आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here