पोलिसांनी केला बलेनोचा पाठलाग : 11,92,000 रु चा मुद्देमालासह देशी दारू जप्त

0
183

वरोरा

पो स्टे वरोरा हद्दीतील नंदोरी हायवे पाइंटवर प्रोरेड करीता सापळा रचला असता एक सिल्वर रंगाची बलेनो MH12 DY 3637 ही भरधाव वेगाने निष्काळजीपणाने अवैद्यरित्या देशी विदेशी दारूची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाल्याने गाडी चा पाठलाग करून वाहन पकडले असता वाहनात देशी दारूच्या एकूण 40 पेट्या (4000 निपा ) , विदेशी दारूच्या 8 पेट्या (384 निपा ) एकूण दारू कि.5,92,000 रु व बलेनो वाहन की 6,00,000 रु असा एकूण 11,92,000 रु चा मुद्देमाल मिळून आला . यातील आरोपीचा शोध घेतला पोलिसांचा पाठलाग बघून अंधाराचा फायदा घेऊन वाहन सोडून फरार झाल्याने फरार वाहन चालक मालक याचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाही मा. पोलीस अधीक्षक श्री अरविंद साळवे सा, मा. अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे सा, मा. निलेश पांडे ,उप विभागीय पोलीस अधिकारी सा. वरोरा यांचे मार्गदर्शनात मा. पोलीस निरीक्षक दिपक खोब्रागडे पो. स्टे. वरोरा यांचे अधिपत्यात पोउपनी सर्वेश बेलसरे, सफो विलास बलकी, नापोशी किशोर बोढे, पोशी कपिल भांडारकर, पोशी सुरज मेश्राम, पोशी दिनेश मेश्राम , पोशी महेश बोलगोडवार यांनी पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here