दगडाने ठेचून विवाहितेचा केला खून, शेतात आढळला मृतदेह

0
397

वणी (यवतमाळ) :

शहरातील पटवारी कॉलनी राहणाऱ्या 32 वर्षीय विवाहितेचा वांजरी शिवारातील शेतात खून केल्याची घटना सकाळी उजेडात आल्याने खळबळ उडाली आहे
जया मनोज आवारी असे मृत विवाहितेचे नाव असून तिचे वरोरा येथे लग्न झाले होते मात्र गेल्या सात वर्षां पासून पती सोबत पटत नसल्याने ती आपल्या दोन मुला सह शहरातील पटवारी कॉलनी येथे किरायाने होती
दि 10 डिसेंबर ला रात्री 8 वाजताचे सुमार लगतच राहत असलेल्या मामा च्या घरी जात असल्याचे सांगून घरून निघाली आणि रात्री घरी परतली नाही आज सकाळी वांजरी शिवारातील बडवाईक यांच्या शेतातील बंड्याजवळ तिचा मृतदेह आढळून आला याची माहिती पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूजलवार यांनी घटनास्थळ गाठूले मृतदेह अनोळखी असल्याने तिची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांन समोर होते काही वेळातच तिची ओळख पटल्याने पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे तिच्या डोक्यावर दगडाने जोरदार प्रहार केल्याने तिचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here