सिद्धार्थ हॉटेल ते बंगाली कॅम्प रस्ता दुरुस्त करा* *महानगर भाजपाची मागणी*

180
हॉटेल सिद्धार्थ ते बंगाली कॅम्प पर्यंतचा रस्त्याची हालत खस्ता झाली असून तो त्वरित दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टी  महानगर चंद्रपुर तर्फे जिल्हाधिकाऱ्याना, आज शुक्रवार(११ डिसेंम्बर)ला दिलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे.
यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,महामंत्री सुभाष कासंगोट्टूवार व भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांची उपस्थिती होती=
         उपरोक्त विषयावर चर्चा करताना डॉ गुलवाडे म्हणाले,गेले कित्येक वर्षांपासून हॉटेल सिद्धार्थ ते बंगाली कॅम्प चौक पर्यंतचा रस्ता अनेक वेळा डागडुगी करून दुरुस्त करण्यात आला पण पुन्हा रस्त्यावर मोठं मोठे खड्डे निर्माण झाले.कोट्यवधी खर्च करूनही समस्या जैसे थे आहे.परिणामी अनेकांना आपले जीव गमवावे लागले तर काहींना व्यंगत्व आले.शहरातील हा परिसर सर्वाधिक वर्दळीचा आहे,हे नव्याने सांगण्याची गरज नाही,पण या रस्त्याची सद्या स्थिती जिवघेणी आहे.हा रस्ता त्वरित दुरुस्त व्हावा,अशी भाजपा महानगर चंद्रपूरची मागणी आहे.यावर योग्य ते पाऊल न उचलल्यास भाजपाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,याकडे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.जिल्हाधिकारी यावर कोणते पाऊल उचलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.