पालकमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त निराधार बालकांना क्रीडा साहित्य व खेळणी वाटप

186

 

घुग्घुस ;- राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास आपत्ती व्यवस्थापन विभाग मदद व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर ओबीसी नेते विजय वड्डेटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त घुग्घुस काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजूरेड्डी यांच्यातर्फे 12 डिसेंम्बर रोजी परिसरातील निराधार बालकांना उत्तम स्वास्थ राखण्यासाठी विविध स्वरूपाचे क्रीडा साहित्य वितरण करण्यात आले.
सोबतच लहान बालकांना आवडणाऱ्या खेळण्याचे वितरण करण्यात आले.
यासोबतच बालकांना मिठाई वाटप करण्यात आली.
व सर्वांनी मिळून पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांच्या दीर्घ आयुष्य व उत्तम निरोगी आरोग्यासाठी सामूहिक प्रार्थना घेतली.
याप्रसंगी कामगार नेते सैय्यद अनवर, बालकिशन कूळसंगे, सचिन कोंडावार, नुरूल सिद्दीकी, रोशन दंतलवार, किरण पुरेल्ली, राजू पोल, देवानंद ठाकरे, व मोठ्या संख्येने घुग्घुस काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.