नगर सेवक विशाल निंबाळकर यांच्या पाठपूराव्याला यश, प्रभागातील विकास कामासाठी 37 लक्ष निधी मंजूर*

0
309

 

विठ्ठल मंदिर प्रभागातील नगर सेवक विशाल निंबाळकर यांच्या सततच्या पाठपूराव्याला अखेर यश आले असून येथील सिंमेट काॅक्रीट रोडच्या कामासाठी 37 लक्ष 44 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
कोरोनाच्या महासंकटात अनेक विकास कामे थांबविण्यात आली आहे. मात्र अशा परिस्थितीतही आपल्या प्रभागातील प्रंलबीत विकासकामासाठी विठ्ठल मंदिर प्रभागातील नगर सेवक विशाल निंबाळकर यांनी चंद्रपूर शहर महानगर पालिकेचा नगरोत्थानचा मोठा निधी आपल्या प्रभागात खेचून आनला आहे. या निधीतून सदर प्रभागातील बावीस चौक ते अभ्यंकर प्राथमीक शाळेपर्यतच्या मार्गाचे काॅक्रीटीकरन करण्यात येणार आहे. या मार्गाचे काम सुरु झाल्याने येथील नागरिकांची जूनी मागणी मार्गी लागली असून प्रभागातील नागरिकांनी नगर सेवक विशाल निंबाळकर यांचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here