अविवाहित युवकाची विहिरीत उडी : विहिरीतून काढून उपचारासाठी नेत असताना वाटेतच झाला मृत्यू

301

चिमूर:- 

चिमूर तालुक्यातील रेंगाबोडी येथील अनिरुद्ध पेरकुंडे वय २३ वर्ष या अविवाहित युवकाने आज  दुपारच्या सुमारास गावातील विहिरीत उडी घेतली.

गावातील नागरिकांच्या लक्षात येताच त्याला विहिरीतून काढून खडसंगीला उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. हा युवक चिमूर येथील एका प्रसिद्ध रक्त तपासणी लॅब मध्ये नोकरी करीत होता.