पोंभुर्णा येथील आठवडी बाजाराचे लोकार्पण तर खुल्‍या नाटयगृहाचे भूमीपुजन २२ रोजी

0
104

माजी अर्थमंत्री तथा विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्‍यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने पोंभुर्णा शहरात पुर्णत्‍वास आलेल्‍या आठवडी बाजाराचे लोकार्पण तसेच खुल्‍या नाटयगृहाच्‍या बांधकामाचे भूमीपुजन दि. २२ डिसेंबर २०२० रोजी संपन्‍न होत आहे.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने पोंभुर्णा शहरात आठवडी बाजाराचे बांधकाम मंजुर करण्‍यात आले असुन ते पुर्णत्‍वास देखील आले आहे. त्‍याचप्रमाणे पोंभुर्णा परिसरातील सांस्‍कृतीक चळवळीला वेग यावा यादृष्‍टीने त्‍यांनी पोंभुर्णा शहरात खुल्‍या नाटयगृहाचे बांधकाम देखील मंजुर करविले आहे. सदर खुल्‍या नाटयगृहाचे भूमीपुजन सायंकाळी ४ वा. तर आठवडी बाजाराचे लोकार्पण सायंकाळी ४.३० वा. संपन्‍न होत आहे. या कार्यक्रमानंतर आ. सुधीर मुनगंटीवार जाहीर सभेला संबोधीत करणार आहेत. या प्रसंगी जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, जिल्‍हा परिषदेचे माजी अध्‍यक्ष देवराव भोंगळे, जिल्‍हा परिषद सदस्‍य राहुल संतोषवार, पोंभुर्णा पंचायत समितीच्‍या सभापती अल्‍का आत्राम, पोंभुर्णा नगर पंचायतीचे माजी अध्‍यक्ष गजानन गोरंटीवार, पंचायत समितीच्‍या उपसभापती ज्‍योती बुरांडे, नगर पंचायतीच्‍या अध्‍यक्षा सौ. श्‍वेता वनकर, उपाध्‍यक्षा सौ. रजीया कुरेशी आदी मान्‍यवरांची उपस्थिती राहणार आहे.

आ. सुधीर मुनगंटीवार पोंभुर्णा शहरातील नागरिकांना दिलेल्‍या वचनांची पुर्तता होण्‍याचा हा सोहळा दि. २२ डिसेंबर रोजी संपन्‍न होत आहे. या सोहळयाला पोंभुर्णा येथील नागरिकांनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन नगरसेवक, ईश्‍वर नैताम, अजित मंगळगीरीवार, विजय कस्‍तुरे, शारदा कोडापे, मोहन चलाख, सौ. सुनिता मॅकलवार, सौ. पुष्‍पा बुरांडे, सौ. नेहा बघेल, श्री. किशोर कावळे, आदींनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here