नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांना चंद्रपूर मनपा कचरा घोटाळा बाबत दिले निवेदन

0
199

चंद्रपूर: मनपा चंद्रपूर कचरा संकलन
तथा आझाद बगीचा कंत्राटाची चौकशी करण्याबाबतचे निवेदन आज दिनांक 20 डिसेंबर रोजी मा. ना.श्री एकनाथजी शिंदे साहेब,नगरविकास मंत्री,महाराष्ट्र राज्य, यांना देण्यात आले. चंद्रपूर शहर मनपाने कचरा संकलनासाठी निविदा मागितल्या. या कामाकरिता 6 कंत्राटदाराने निविदा सादर केल्या होत्या. दोन निविदा तांत्रिक पूर्तता न केल्याने रद्द झाल्या. यात मे.स्वयंभु ट्रान्सपोर्ट ,पुणेचा दर 1700 रुपये प्रति मेट्रिक टन होता. मनपा स्थायी समितीने या संस्थेला काम दिले.परंतु ही सर्व प्रकिया रद्द करण्यात येऊन, मनपा चंद्रपूरने परत या कामाकरिता इ-निविदा मागितली. यात 7 वर्ष आणि वाढीव 3 वर्ष असे ऐकून 10 वर्षाकरिता कंत्राट देण्यात येईल असा बदल करण्यात आला.आधी काम मंजूर झालेल्या मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट, पुणे या संस्थेचा दर कमी होता मात्र यात 800 रुपये वाढविण्यात आले आणि दर 2552 रुपये प्रति मेट्रीक टन करण्यात आला.चंद्रपूर मनपा स्थायी समितीने याला मंजूरी दिली असून या सर्व प्रकरणात फार मोठे ‘अर्थकारण’ झाले आहे यासर्व प्रकरणाची आपण चौकशी करून सत्य बाहेर आणावे.
तसेच आझाद बगीचा कंत्राटात दोन वर्षात दोन कोटींची वाढ झाली असून जुने कंत्राटदार मे. विजय आर.घटे इंजिनिअर्स कॉन्ट्रॅक्टर चंद्रपूर यांची निविदा 15 टक्क्याने ज्यादा होती. 2016 मध्ये मे.विजय आर. घटे इंजिनिअर्स कॉन्टॅक्टरला हे काम 4 कोटी 46 लाख 25 हजार 901 रुपयात देण्यात आले. 16 फेब्रुवारी 2019 मध्ये निविदा काढुन ,हे काम चौथ्या निविदात मे. विजय घटे इंजिनिअर्स यांना (15 टक्के ज्यादा) दराने मिळाले. याच कामाची किंमत 6 कोटी 53 लाख 64 हजार 670 रुपये एवढी झाली असून याची सुद्धा आपण चौकशी करावी अशी विनंती करण्यात आली. मा. मंत्री मोहदय साहेबांचे ह्या विषयावर लक्ष असून लवकरच चौकशी करून सत्य बाहेर येईल असे यावेळी सांगितले. याप्रसंगी रा.काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा मनपा नगरसेवक श्री दीपक जयस्वाल, शरद पवार विचार मंच जिल्हाध्यक्ष निमेश मानकर,शिवसेना जिल्हाध्यक्ष श्री संदीप गिर्हे, श्री नितिन मत्ते , उपाध्यक्ष संजय तुरीले, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here