पोंभुर्णा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन*

0
193

 

पोंभुर्णा :- येणाऱ्या पोंभुर्णा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या व पोंभुर्णा नगरपंचायतीच्या निवडणूक बघता तालुक्यातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पोंभुर्णा शहरात सावित्रीबाई फुले चौक पोंभुर्णा येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटनीस हेमंत गडकरी यांच्या हस्ते संपन्न झाला.तसेच विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश हि घेण्यात आला.
जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटनिस हेमंत गडकरी यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज साहेब अंगार है या शब्दात आपले मनोगत व्यक्त करतांना पोंभुर्णा तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीला या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांचे कामे झाले पाहिजे कुणीही रिकाम्या हाताने परत जाणार नाही जनमानसांच्या समस्येचे निराकारन झाले पाहिजे आता मनसे शिवाय पर्याय नाहि प्रत्येक घरा घरात सन्मानिय राज साहेंबांचे विचार पोहचले पाहिजे येनार्या ग्रा.पं.,नगरपंचायत निवडनुका जोमाने लढा गावागावात मनसेचा झेंडा फडकला पाहिजे राज साहेबांचे हात अधिक बळकट करन्यासाठी एकत्र या तेव्हाच या जनसंपर्क कार्यालयाचा खर्या अर्थाने उद्घाटन झाले असे मि समजतो कार्यक्रमाला तालुक्यातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून दिलीप रामेडवार मनसे जिल्हाध्यक्ष, सुनिता गायकवाड महिला जिल्हाध्यक्ष,किशोर मडगुलवार जिल्हासचिव बल्लारपूर विधानसभा क्षेत्र,कुलदिप चंदनखेळे जिल्हाउपाध्यक्ष मनविसे,मंदिप रोडे चंद्रपूर शहर अध्यक्ष ,श्याम पुणानी नागपूर शहर सचिव,राजु बघेल,मनोज तांबेकर,तूशार येरमे, अर्चना आमटे,महालीग कंठाडे,वर्षा लोंबडे, शिवगंगा मडपती प्रामुख्याने उपस्थीत होते तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर मडगुलवार जिल्हासचिव बल्लारपूर विधानसभाक्षेत्र, आकाश तिरुपतिवार पोंभूर्णा तालूका अध्यक्ष, आशिष नैताम पोंभूर्णा तालूका अध्यक्ष मनविसे, अमोल ढोले तालूका सचिव,प्रविण शेवते,क्रिष्णा गुप्ता,निखील कन्नाके,किशोर वाकुडकर यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here