घुग्घुस नगरपरिषद : महिला सभापती व पंचायत समिती सदस्यांना आपली मते द्यावी

211

घुग्घुस : नगरपरिषद निर्मितीची प्रक्रिया शुरू असून घुग्घुस जिल्हापरिषद सदस्य व महिला सभापती सौ. नितु विनोद चौधरी, पंचायत समिती सदस्य व उपसभापती निरीक्षण तांड्रा व पंचायत समिती सदस्या सौ. रंजीता पवन आगदारी यांचे मत मागविण्या संदर्भातील जिल्हापरिषद चंद्रपूर मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कार्यलयातील पत्र घुग्घुस ग्रामपंचायत येथे आल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांनी दिलेली आहे.

काही दिवसांपूर्वी भाजप नेते व महिला सभापती यांचे पतीदेव यांनी खोट्या हरकती घेण्यासाठी केलेला खटाटोप पाहता नगरपरिषद निर्मितीचे श्रेय घेणारी भाजप डावपेचात अडकणार की काय ?
असे चिन्ह दिसत आहे भाजप जिल्हाध्यक्षाने ग्रामपंचायत निवडणूक होणार नाही हे आपल्याच स्तरावर घोषित करून टाकले आहे
अश्या परिस्थितीत भाजप नेते व जीप सभापती व पंचायत समिती उपसभापती काय अभिप्राय देतात यांच्याकडे घुग्घुस वासीयांचे लक्ष लागलेले आहे.
एकीकडे ग्रामपंचायत निवळणूकीची धामधूम शुरू असून दुसरीकडे नगरपरिषद निर्मितीची प्रक्रिया शुरू आहे.
यामुळे घुग्घुस वासियांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.