घुग्घुस : ग्रामपंचायतच्या निवडणूकीवर सर्वपक्षीय सामूहिक बहिष्कार

231

घुग्घुस : 27 वर्षांपासून प्रलंबित घुग्घुस ग्रामपंचायतला नगरपरिषद मध्ये रूपांतर करण्याकरिता ग्रामपंचायत निवडणूकिवर बहिष्कार टाकण्या करिता आज दिनांक 23 डिसेंम्बर 2020 रोजी ग्रामपंचायत कार्यलयात सर्वपक्षीय काँग्रेस,भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, बी.आर.एस.पी. बसपा, रिपाई, व सर्व सामाजिक संघटनेच्या संयुक्तमताने हा निर्णय घेण्यात आला आहे.
यानुसार कोणीही ग्रामपंचायत निवडणूक लढणार नाही
कुणी ही ग्रामपंचायत कार्यलयातून दाखले घेणार नाही तसेच पंचायत समिती सदस्य सौ.रंजना आगदारी या पदाचा राजीनामा देणार असल्याचे ही जाहीर करण्यात आले.
हा घुग्घुस गावात आज घेण्यात आलेला ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.