काय झाले ? जिल्हा पोलीस अधीक्षकांनी महिलेला दिलेले आश्वासन ?

0
209

हप्ता वसुली करणाऱ्या पडोली पोलिसांवर कारवाई झाली नसल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह.

चंद्रपूर  जिल्ह्याची दारूबंदी कुणामुळे फसली असेल तर त्यामधे पोलीस प्रशासनाचा सर्वात मोठा वाटा आहे, त्याचे कारण असे की त्या दारूबंदी कडे पोलीस प्रशासन एक संधी म्हणून बघतात त्यामुळे दारूबंदी चा बट्ट्याबोळ झाला असल्याचे चित्र आहे. अशातच चिल्लर दारू विक्रेत्यांना वेठीस धरून बड्या दारू विक्रेत्यांकडून हप्ता वसुलीची मोठी रक्कम वसूल करणारे पोलीस संबंधित व्यक्तीवर दारू संदर्भात गुन्हे दाखल झाल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडून अगाऊची रक्कम वसूल करतात असाच एक मामला पडोली पोलीस स्टेशन अंतर्गत घडला असून दादाराव नावाच्या पोलीस हवालदाराने एका अवैध दारू विक्री करणाऱ्या महिले विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर सुद्धा तिचेकडुण दहा हजार रुपयाची मागणी केल्याची ऑडियो क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती त्या संदर्भात त्या पिडीत महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार देवून त्या पैशाची मागणी करणाऱ्या दादाराव नावाच्या पोलिस हवालदारा वर कारवाई करण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी त्या महिलेला कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते मात्र मागील दहा दिवसापासून संबंधित पोलिसांवर कारवाई तर झाली नाहीच उलट ठाणेदार कसार हे त्या प्रकरणात गुंतले असल्याने हे प्रकरण रफादफा होणार असल्याचे संकेत मिळत आहे.त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here