पत्रकाराने लुटले वृत्तपत्र विक्रेत्याला , भरदिवसा रहदारीच्या चौकात घडली घटना

0
694

चंद्रपूर – शहरात मागील काही दिवसांपासून लुटमारीच्या घटनेत वाढ होत आहे, नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे पोलीस प्रशासन आवाहन करीत आहे, या गुन्ह्यात अल्पवयीन बालकांचा समावेश आहे.
नगीनाबाग येथील मच्छिंद्र वाळके हे वर्तमानपत्र वितरणाचे काम करतात, 22 डिसेंम्बरला वाळके हे वर्तमानपत्र वितरण व वसुली करून सकाळी 10.30 च्या सुमारास अरविंदनगर चौकात उभे असतांना 25 ते 30 वयोगटाचा 1 युवक आपल्या दुचाकी वाहन क्रमांक mh34 0532 ने त्यांच्याजवळ येत म्हणाला की तू वाहतुकीचा नियम मोडला, तुझ्यामुळे मी पडलो असतो, मी चंद्रपुरातील स्थानिक वृत्त वाहिनीचा पत्रकार आहे असे म्हणत तू पोलीस स्टेशनला चल असे म्हणू लागला, मी काही केलं नसल्याचे त्या युवकाला म्हणालो असता तो काहीही न ऐकण्यास तयार नव्हता अखेर मी माझी मोटारसायकल काढत चल म्हटलं ठाण्यात मात्र त्या युवकाने माझ्या गाडीवर बस असे म्हणत साधारणतः 200 मीटर अंतरावर नेले असता त्याने आपली दुचाकी थांबवित आपण इथेच सेटलमेंट करू असे म्हणत माझ्या खिशातील 6 हजार 500 रुपये जबरदस्तीने काढून घेत तो निघून गेला.
घडलेल्या या प्रकाराची वाळके यांनी रामनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली असता पोलिसांनी 392 अंतर्गत गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.

या घटनेत जर पैसे घेणारा स्थानिक वृत्त वाहिनीचा पत्रकार असेल तर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करायला हवी, मात्र कुणी पत्रकाराच्या नावावर असे कृत्य करून पत्रकारांना बदनाम करीत असेल तर ते योग्य नाही, घटना परिसरात अनेक सीसीटीव्ही कॅमेरे लागले असून पोलिसांनी ते तपासून चौकशी करायला हवी, नाहीतर अश्या घटना भविष्यात घडतच राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here