संकटाला मात देणारे व्यक्तिमत्त्व : अर्चना उपरे

0
210

■बाबांचे स्मरण.. ■ पंढरीपाटील ताजने हे माझ्या बाबांचे नाव.वरोरा तालुक्यातील खांबाडा हे त्यांच गाव..बाबांना जाऊन आज तीन वर्ष पूर्ण झाली,पण त्यांचे बाबत नतेवाईकांमधे जितकं भरभरुन बोललं जातं त्याहीपेक्षा अधिक गावात आणि मित्र परिवारात बोलल्या जातं..कुणालाही मदत करण्याचा आणि एखादं काम अंगावर घेतलं तर ते समर्पित भावनेने न थकता पुर्ण करण्याचा त्यांच्यातील गुण.या गुणामुळेच बाबांनी अनेक जिवाला जीव देणारे मित्र जोड्लेआणि आयुष्यभर ते टिकवण्यासाठी जिवापाड मेहनत घेतली..त्यांचा मित्र परिवारही खुप मोठा होता..सामान्य मजुरा पासून मंत्री,आमदार,खासदारांपर्यंत..ते भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष होते..सर्व समान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी ते अहोरात्र झटले..पण पैस्याची आणि पदाची अपेक्षा त्यांनी कधी केली नाही..राजकारण,समाजकारण असा सर्व व्याप सांभाळून देखील ते अत्कृष्ट शेती करीत ..शेतीवर त्यांनी जिवापाड प्रेम केलं.अर्थात माझ्याआईने देखील शेतीत त्यांना तितकीच मोलाची साथ दिली. महिलांना सन्मानाची वागणूक देण्याबाबत त्याचा आग्रह असायचा..बाबा जास्त शिकलेले नव्हते,पण शैक्षणिक आणि सामजिक जान त्यांना कमालीची होती..आम्हा मुलींनी नेहमीच सर्व व्यवहारात निपुण व्हावं,आत्मनिर्भर व्हावं असं त्यांना नेहमी वाटत होतं..ते सतत उत्साही राहात..कितिही संकट आली तरी डगमगु नका..त्याला हिमतीने तोंड द्या असे ते नेहमी सांगत आणि संकटग्रस्ताच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्याला हिंमत देत असे.एव्हढे खंबीर ,उत्साही बाबा बोलता बोलता एका क्षणी अचानक आम्हा सर्वांना दुखा:च्या खाईत लोटून कायमचे निघुन गेले…त्यांचा चेहरा डोळ्यासमोर सतत येत राहतो.त्यांचे स्मरण झाले की मी नकळ्त अश्रुंना वाट मोकळी करून देते..आणि पुन्हा नव्याने आयुष्याला सामोरी जाते.. ■सौ.अर्चना प्रभाकर उपरे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here