ग्रामपंचायत निवडणूक : नामांकनाचा शेवटचा दिवस असून सुद्धा घुग्घुस येथून एक ही नामांकन नाही

262

घुग्घुस : ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूकीचे नामांकन अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आज सांयकाळी 5:30 पर्यंत अर्ज दाखल करता येईल ऑनलाइनची अट ही निवडणूक आयोगाने रद्द केली आहे.
घुग्घुस ग्रामपंचायतला नगरपरिषदे करा या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणूकीवर सामूहिक बहिष्कार टाकून आंदोलनाची मालिकाच शुरू केली आहे. यामध्ये घुग्घुस बंद, चक्का जाम, मुंडण व अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.

आज शेवटच्या दिवसा पर्यंत घुग्घुस ग्रामपंचायत निवडणूकी करीता एक ही अर्ज दाखल करण्यात आलेला नाही. आज शेवटच्या दिवस असल्याने सर्वांचे लक्ष ग्रामपंचायत कार्यलयाकडे परवाने दाखले घेण्यासाठी येणाऱ्याकडे लागले आहे.