घुग्घुस वासीयांना मिळाली नगरपरिषदेच्या रुपात नववर्षाची सप्रेम भेट

0
104

चंद्रपूर : जिल्ह्यातील औद्योगीक शहर म्हणून प्रसिध्द असलेल्या घुग्घुस ग्रामपंचायतला नगरपरिषदेचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी गेली 27 वर्ष घुग्घुस येथील विविध राजकीय पक्ष समाजिक संघटना व नागरिकांनी विविध स्वरूपाच्या आंदोलनाने शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

राज्यात महाविकास आघाडीचे सत्ता येताच पालकमंत्री विजय वड्डेटीवार यांनी नियोजन भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत घुग्घुस नगरपरिषदेला हिरवी झेंडी दाखविली व लगेच 31 आगस्ट 2020 रोजी घुग्घुस नगरपरिषदेची प्रथम अधिसूचना शासकीय स्तरावर जाहीर करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here