तब्बल १० वर्षांपासून ग्रॅज्यूएट भावा-बहिणींनी केलं स्वत:लाच खोलीत बंद; कारण वाचून बसेल धक्का

0
524

मुंबई

तीन ग्रॅज्यूएट भावा-बहिणींनी तब्बल १० वर्षांपासून स्वत:लाच खोलीत बंद केला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका एनजीओने त्या तिघांना वडिलांच्या मदतीने वाचवले आहे. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना गुजरात राज्यातील राजकोटमध्ये घडली आहे.

याबाबत बोलताना ‘साथी सेवा ग्रुप’ नावाच्या बेघरांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या एनजीओचे अधिकारी जालपा पटेला यांनी सांगितले की, अमरीश आणि भावेश तसेच त्यांची बहिण मेघना यांनी जवळपास १० वर्षांपूर्वी स्वत:ला खोलीमध्ये बंद करुन घेतलं होते. त्यांच्या वडिलांनीच ही माहिती दिल्याचे समोर आले आहे.
[12/31, 9:33 PM] Vinod Pannase: तसेच या सर्व प्रकाराबाबत मुलांच्या वडिलांनी सांगितले की, १० वर्षांपूर्वी आईचं निधन झाल्यानंतर ते याप्रकारच्या स्थितीत राहू लागले. तिन्हीही मुले सुशिक्षित आहेत. आईच्या निधनानंतर मुलांनी स्वत:ला एका खोलीत बंद करवून घेतले. वडील रोज खोलीच्या बाहेर जेवण ठेवायचे.

वडिलांनी सांगितले की, मोठा मुलगा ४२ वर्षांचा असून त्याच्याजवळ बीए, एलएलबी ची डिग्री असून तो वकिली करायचा. मुलगी मेघान ३९ वर्षांची असून तिने यांनी मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी घेतली आहे. लहान मुलगा अर्थशास्त्रात पदवीधर झाला असून तो एक चांगला क्रिकेटपटू होता.

दरम्यान, पटेला यांनी रविवारी संध्याकाळी त्यांच्या संघटनेच्या सदस्यांनी खोलीचा दरवाजा तोडला तेंव्हा त्यांना खोलीत जराही प्रकाश दिसला नाही. खोलीतून शिळ्या अन्नाचा तसेच मानवी विष्ठेचा वास येत होता. तसेच खोलीत चारी बाजूला वर्तमान पत्र आढळून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here