पानवडाळा ग्रामपंचायतीत घडला इतिहास* 60 वर्षा नंतर प्रथमच सातही सदस्यांची अविरोध निवड

0
125

भद्रावती,दि.५

भद्रावती तालुक्यातील पानवडाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रदीप महाकुलकर यांच्या प्रयत्नाने ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून तब्बल साठ वर्षाच्या दिर्घकालखंडात २०२१ च्या ग्रा.पं. निवडणुकीत प्रथमच सातही सदस्य अविरोध निवड्रून आल्याने इतिहास घडला आहे.
विशेष म्हणजे सरपंचासह सातही सदस्य यापूर्वीच्या २०१५-२०२० या ग्रा.पं. कालावधीतील आहेत. दिनांक ४ जानेवारी २०२१ रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पानवडाळा ग्रा.पं.मधील तीन वार्डात केवळ सातच उमेदवार शिल्लक असल्याने या सातही जणांचा विजय निश्चितपणे अविरोध होणार असल्याचे स्पष्ट झालेआहे.
वार्ड क्रमांक १ मधून माजी सरपंच प्रदिप महाकुलकर आणि सुषमा उताने, वार्ड क्रमांक २ मधून सुनिल माडेकर आणि छाया पिंपळकर,वार्ड क्रमांक ३ मधुन मोहन आसेकर, कल्पना घोसरे आणि दिपाली काळे असे सात सदस्य अविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पानवडाळा गावाची लोकसंख्या ८५० असून मतदार ६४० आहेत. ही निवडणूक अविरोध होण्यासाठी माजी सरपंच प्रदिप महाकुलकर यांच्या मार्गदर्शनात सुरेश घोसरे, गजानन उताने, लहूजी बोथले, श्रीकृष्ण आस्वले,रविन्द्र घोसरे, गुणवंत उताने, निलेश उताने, पंढरी पिंपळकर, सुर्यकांत विधाते, नामदेव महाकुलर, राकेश जुनघरे, ईश्वर उताने, वासुदेव माडेकर, तुळशीराम महाकुलकर, गणेश बोथले, विठ्ठल पिंपळकर,भाऊराव महाकुलकर आणि संजय काळे यांनी प्रयत्न केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here