माईनिंग सरदार व ओव्हरमॅनच्या रिक्त जागा भरा : चांदा ब्रिगेड

132

चंद्रपूर

आमदार किशोर जोरगेवार यांच्या दणक्यानंतर खात्याअंतर्गत माईनिंग सरदार पदाच्या २२८ जागा भरण्यास वेकोली प्रशासनाच्या वतीने मंजुरी देण्यात आली आहे. मात्र या जांगासह सर्वसाधारण पदांची भरती प्रक्रियाही राबवत माईनिंगचे प्रशिक्षण घेऊन नूकतेच उत्तीर्ण झालेल्यांसाठीही जागा काढण्यात याव्यात अशी मागणी आ. किशोर जोरगेवार यांच्या वतीने करण्यात आली असून या मागणीसाठी आ. जोरगेवार यांच्या नेतृत्वात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने सि.एम.डी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. यावेळी वेकोली प्रशासनाच्या विरोधात नारेबाजी करत मोर्चकरुंनी आपला रोष व्यक्त केला. या आधीही आ. जोरगेवार यांच्या मोर्चा नंतर येथील माईनिंग सरदार पदाच्या ३३३ जागा वेकोली प्रशासनाच्या वतीने भरण्यात आल्या होत्या हे विशेष.
नागपूर वेकोली विभागात अनेक कोळशाच्या खाणी असुन सुद्धा या ठिकाणी अपेक्षित असा रोजगार स्थानिक युवकांना उपलब्ध झालेला नाही. जिल्ह्यातील अनेक कोळश्याच्या खाणी बंद पडल्या आहेत. त्यामुळे इथे काम करणार्या युवकांचा रोजगार बुडाला आहे. अश्यातच वेकोली प्रशासनाकडून २०१८ पासून माईनिंगमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. परिणामी माईनिंग अभ्यासक्रमामध्ये पास झालेले हजारो युवक अद्यापही नौकरीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामध्ये त्यांची वयोमर्यादा वाढत चालली आहे. उत्तीर्ण असून सूध्दा भरती प्रक्रिये अभावी नौकरीपासून वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर ओढावली आहे. त्यातच परराज्यात भरती प्रक्रिया राबवून तेथील युवकांना येथे नियुक्ती करण्याचा कट वेकोली प्रशासनाच्या वतीने रचल्या जात आहे.
चंद्रपूरातील या कोळसा खानींमूळे येथील नागरिकांना प्रदुषनाचा सामना करावा लागत आहे. येथील खानींमध्ये होणा-या बाटींगमुळे येथील वसाहतींना शती पोहचत आहे. इतकी किंमत मोजूनही येथील युवकांना येथे रोजगार दिल्या जात नसेल तर हा अन्याय आहे. त्यामूळे या विरोधात व नागपूर वेकोली अंतर्गत येणा-या कोळसा खानीतील सर्व साधारण गटातील माईनिंग सरदार व ओव्हरमेन पदाच्या रिक्त जागा भरण्यात याव्यात अन्यथा नागपूर येथील सि.एम.डी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा ईशारा आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने देण्यात आला होता. याची दखल घेत वेकोली प्रशासनाच्या वतीने माईनिंग सरदार पदाच्या २२८ जागा काढण्यास मंजूरीही दिली आहे. मात्र या जागा खात्याअंतर्गत भरण्यात येणार असल्याने नुकतेच माईनिंगचे प्रशिक्षण घेऊन उत्तिर्ण झालेल्या युवकांचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. २०१८ पासून वेकोली तर्फे हे पद रिक्त ठेवण्यात आले आहे. त्यामूळे अगोदरच या विभागाशी संबधित शिक्षण घेतलेला युवक चिंतीत आहे. आता खात्याअंतर्गत भरती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने त्यांची चिंता आणखी वाढली आहे.
त्यामूळे खात्याअंतर्गत भारतीसह सर्वसाधारण गटासाठीही भरती प्रक्रिया राबवत फ्रेशिअर युवकांनाही नौकरीत सामावून घेण्यात यावे अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी सदर मोर्चा काढण्यात आला. एका महिण्याच्या आता माईनिंग सरदार व ओव्हरमॅन गटातील रिक्त पदे भरण्यात यावी, नियुक्त झालेल्या उमेदवरांना सहा महिण्याच्या आत कामावर रुजु करण्यात यावे, भरती प्रक्रियेत विदर्भातील युवकांना प्राधान्य देण्यात यावे या प्रमूख मागण्यांसह इतर मागण्याकडे या हल्लाबोल मोर्च्याच्या माध्यमातून वेकोली प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
यावेळी नागपूर वेकोली सि.एम.डी कार्यालयाचे आर आय, जि.एम. इगबाल सिंग यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप, युवा नेते अमोल शेंडे, पंकज गुप्ता, विलास सोमलवार, विनोद अनंतवार, करणसिंह बैस, तिरुपती कलगुरुवार, सलीम शेख, राशेद हुसेन जितेश कुळमेथे, विश्वजीत शाहा, हरमन जोसेफ, तापोश डे, प्रतिक शिवणकर, नकूल वासमवार, गौरव जोरगेवार, बबलू मेश्राम, राहूल मोहुर्ले, दिपक पद्मगीरवार, पंकज चिमूरकर, यांच्यासह माईनिंक सरदार यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.