क्रांती जोती सावित्री बाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विठ्ठल मंदिर स्टेडियम मध्ये सांस्कृतिक कार्येक्रम संपन्न

0
214

चंद्रपूर

क्रांती जोती सावित्री बाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विठ्ठल मंदिर वार्ड ,विठ्ठल मंदिर स्टेडियम मध्ये सांस्कृतिक कार्येक्रम आयोजित करण्यात आले यामध्ये (टाकाऊ पासून टिकाऊ स्पर्धा), वस्तूंची विक्री व खरेदी (आनंद मेला),गायन,वाद्य, व नुत्य स्पर्धा ,राजमाता यंग गृप व साईबाबा बहुद्देशीय शिक्षण संस्था च्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली़ तरी कार्यक्रमाचे उद्घाटन मजदुर युनियन सिमेंट गाडचांदुर जी. चंद्रपूर बी. डी. सिंग साहेब यांच्या हस्ते करण्यात आले ,त्यावेळी डॉ़ पालीवाल सर, युवासेना जिल्हा प्रमुख प्रा.निलेश बेलखेडे सर,शिवसेना महिला शहर प्रमुख वर्षा ताई कोठेकर,युवासेना शहर प्रमुख अक्षय आंबिरवार,अतुल भाऊ ठाकरे, नेत्रा ताई इंगूलवार, तुळशीराम जांभूळकर माहिती अधिकार पत्रकार सर्क्षणसमिती महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष ,मिस ग्लोबल इंडिया स्मिता चावडा मॅडम,मानव अधिकार पत्रकार समिती जिल्हा प्रमुख करण कोलुगिरीजी,दीव्यांग संस्थान रत्ना ताई राजमाता यंग ग्रुप च्या अध्यक्षा प्रगती पडगेलवार,साईबाबा बहुद्देशीय शिक्षण संस्था अध्यक्षा नंदाताई आलुरवार,आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होते.सदर कार्यक्रमाचे आयोजनाकरीता दोन्ही संस्थेच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमाचे विजेता प्रथम पारितोषिक सी सेवन ग्रुप ला मिळाले.द्वितीय पारितोषिक हे दोघांना देण्यात आले त्यात अनुष्का चोहान, यांना देण्यात आले.तृतीय पारितोषिक प्रतीक्षा बावणे यांना देण्यात आले. तसेच गायन स्पर्धेत प्रथम पारितोषिक प्रशांत शामकुवर, द्वितीय पारितोषिक कुमोद रायपुरे, मोणाक्षी यादव,तृतीय पारितोषिक शुभम लोखंडे यांना देण्यात आले इतर सर्वांना प्रोत्साहन पर बक्षीस देण्यात आले.हा कार्यक्रम अतिशय शांत पद्धतीने पर पडला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here