शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी दिली १ लाखाची देणगी

0
335

राजे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळा ने व्यक्त केली कृतज्ञता

 

चंद्रपूर

चंद्रपुरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा रहावा, ही जनभावना आहे. त्या आस्थेच्या मागणीला घेऊन सर्वपक्षीय हात पुढे सरसावले आहेत. काल, ६ जानेवारी रोजी माजी खासदार नरेश बाबू पुगलिया यांनी या प्रेरक कार्यासाठी १ लक्ष ११ हजार रुपयांचा निधी देऊन जनभावनेचा सन्मान केला. यावेळी त्यांनी या कार्याला आपल्या शुभेच्छा ही दिल्या.

छत्रपती राजे शिवाजी महाराज स्मारक मंडळातर्फे चंद्रपूर शहरात मागील अनेक वर्षांपासून राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक(पुतळा) निर्माण करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. प्रतिष्ठित नागरिक दीपक बेले यांच्या नेतृत्वात शहर व जिल्ह्यातील अनेक शिवराय प्रेमी या कामासाठी प्रयत्नरत आहेत. याचाच एक भाग म्हणून काही महिन्यांपूर्वी छत्रपती राजे शिवाजी महाराज स्मारक मंडळाची नोंदणी करण्यात आली.

या मंडळांमध्ये सर्वपक्षीय व सामाजिक-राजकीय क्षेत्रात काम करणारे विविध कार्यकर्ते यांना सामावून घेण्यात आले.यानंतर जिल्ह्यातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांना भेटून स्मारका बद्दल चर्चा करण्याचे नियोजन करण्यात आले. स्मारकाची जागा ठरविणे, त्यासाठी निधीची तरतूद करणे अशा प्राथमिक गोष्टीसाठी चर्चा करण्यासाठी मान्यवरांच्या भेटी देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्याचे माजी खासदार नरेश पुगलिया यांची भेट घेऊन मार्गदर्शन घेण्यात आले.
दिनांक ६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता छत्रपती राजे शिवाजी महाराज स्मारक मंडळाचे अध्यक्ष दीपक बैले,सचिव दिलीप रिंगणे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने नरेश बाबू पुगलीया यांच्याशी चर्चा केली. या शिष्टमंडळा मध्ये मंडळाचे पदाधिकारी शैलेश जुमडे, निलेश मानकर ,पप्पू देशमुख चिराग नथवाणी, गजानन गावंडे,देवेन्द्र बेले इत्यादी सदस्य उपस्थित होते. माजी खासदार पुगलियाया यांनी संकल्पनेचे स्वागत करून स्मारकाच्या उभारणीमध्ये कोणताही अडथळा येऊ नये तसेच ठरलेल्या वेळेमध्ये स्मारकामध्ये निर्माण व्हावे असा मानस व्यक्त केला. यावेळी त्यांनी स्वतः पुढाकार घेत व्यक्तिगत १ लक्ष ११ हजार रुपये देणगी देऊन एक सुखद धक्का देत सर्वांचा उत्साह वाढविला.यापुढे सुध्दा मदत करण्याचे आश्वासन पुगलिया यांनी दिले. याप्रसंगी नगरसेवक अशोक नागापुरे ही उपस्थित होते.

पुतळा उभारणीचा मार्ग सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी,नेते, सर्व सामाजिक कार्यकर्ते तसेच सामान्य नागरिक यांच्या मदतीने निश्चितपणे लवकरच पूर्णत्वास जाईल अशी अपेक्षा मंडळाचे अध्यक्ष दीपक बेले यांनी व्यक्त केल्याची माहिती प्रसिध्दी प्रमुख मुकेश वाळके यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here