पंतप्रधानांना सद्बुद्धी देरे देवा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना सद्बुद्धी यावी यासाठी बल्लारपुरात सद्बुद्धी यज्ञ

0
131

 

*सद्बुद्धि हवन मध्य युवक कांग्रेस राष्ट्रीय सचिव विजय सिंग उपस्थिति होते*

बल्लारपूर – अक्षय भोयर (ता,प्र)

देश विक्रीस काढायला निघालेल्या प्रधान मंत्री मोदींना सदबुद्धि येण्यासाठी बल्लारपूर विधानसभा युवक काँग्रेस ने सद्बुद्धी यज्ञ करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी चालविलेल्या खाजगी करणाचा जोरदार विरोध केला.

स्थानिक बचत भवन परिसरात सांयकाळी 7 वाजता या सदबुद्धी यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.पूर्व सांसद नरेश पुगलियाच्या मार्गदर्शनाथ व जिल्हाउपाध्यक्ष करण पुगलिया च्या नेतृत्वात युवक काँग्रेस अध्यक्ष चेतन गेडाम ने पंडितांच्या हातून संस्कृत श्लोकाद्वारे नरेंद्र मोदी यांना सद्बुद्धी येण्यासाठी हा आगळा वेगळा उपक्रम युवक काँग्रेसने राबविला होता.

रेल्वे,विमान कंपनी,बीएसएनएल तोट्यात दाखवून त्यांचे खाजगीकरण करण्याचा सपाटा मोदी सरकार ने चालविला आहे.देशातील करोडो युवक बेरोजगारी ने त्रस्त असतांना,देशाचा पोशिंदा शेतकरी आंदोलन करून हक्काची लढाई लढत असतांना उद्योग पत्यांना लाभ पोहचविण्याचे कारस्थान मोदी सरकार करत असल्याची टीका युवक काँग्रेस चे बल्लारपूर विधान सभा अध्यक्ष चेतन गेडाम यांनी केली.या यज्ञातून प्रधान मंत्री नरेंद्र मोदींना सुबुद्धी सुचून देश प्रगतीच्या वाटेने जावा,यासाठी या सद्बुद्धी यज्ञाचे आयोजन केले.हवन कार्यक्रमात युवक कांग्रेस राष्ट्रीय सचिव विजय सिंग, जिल्हा प्रभारी इरशाद शेख, जिल्हा अध्यक्ष हरीश कोतावार,जिल्हा सचिव रमीज़,शंकर महाकाली,गोपाल कलवल,सिकंदर खान,जुनैद सिद्दीकी,सुनील मोतीलाल,संजू सुदाला,संदीप नक्षिणे,अजहर शेख,शैलेश लांजेवार, जॉन कनकूटला, चंचल मून,समीर खान, काशी मेगनवार, श्रीकांत गुजरकर, प्रेम तारला, गोलु पवार, अविनाश पोहनकर,रूपेश रामटेके,साहिल शेख, प्रदीप दारला,युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here