अबब : दुचाकी वाहनाच्या झडतीत 1800 देशी दारु पोव्य

233

घुग्घुस-

दि.08 रोजी- मध्ये रात्री दरम्यान नकोडा पोलीस नाक्यावर आरोपी शेख अरबाज रफीक कुरेशी वय 20 वर्ष रा.अमराई वार्ड, घुग्घुस हा देशी दारू घेऊन यवतमाळ जिल्ह्यातील वणी वरून मुंगोली मार्गे घुग्गुस कडे येत असल्याची गुप्त माहिती मिळताच नकोडा पोलीस चौकीवर पोलिसानी सपाळा रचला.

त्याच्या ताब्यातील दुचाकी वाहनाची झडती घेतली असता 1800 नग रॉकेट देशी दारु संत्रा कंपनीच्या सिलबंद प्लॉस्टीक ‍शिश्या प्रत्येकी 90 मिली. ने भरलेल्या सिशा , किंमत 90,000/- रु. व नवीन विना नंबरची दुचाकि किंमत 70,000/रु असा एकुण 1,60,000चा माल मिळाला आल्याने पोलीस स्टेशन घुग्घुस येथे कलम 65 (ई) मदाका अन्वये गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही पो.नि. राहुल गांगुर्डे यांचे मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे सहा.पोउपनि गौरीशंकर आमटे,मनोज धकाते,नितीन मराठे,रविन्द्र वाभीटकर, रंजित बुरसे यांनी पार पाडलेली आहे.