पतंगीच्या नायलॉन मांजाने कापला युवकाचा गळा : उपचारासाठी नेताना रस्त्यातच झाला त्याचा मृत्यू

0
1324

नागपूर राज्य सरकारने १९८६च्या पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम ५ नुसार या मांजाची विक्री व वापरावर बंदी घातली आहे. तरीही या मांजाची विक्री आणि वापर सर्रास सुरू असतो. मकरसंक्रांत तोंडावर आली आणि पतंगबाजी करणाऱ्या युवकांनी मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा खरेदी केला आहे मात्र या मांज्याने नागपूर शहरातील एका युवकांचा गळा चिरल्याने मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे.

प्रणय प्रकाश ठाकरे 22 वर्षीय मृत युवकाचे नाव आहे. प्रणय सकाळी वडिलांसोबत बहिणीच्या एडमिशन साठी घराबाहेर पडला होता, काम झाल्यावर प्रणयचे वडील तू चल मी मागून येतो म्हणून वाटेत थांबले मात्र प्रणय घरी पोहचला नाही.  प्रणय हा जाटतरोडी मार्गावर जात असताना अचानक प्रणयच्या गळ्याला नायलॉन मांजा अडकला व त्याचा गळाच चिरला, रक्ताची धार त्या ठिकाणी वाहू लागली, प्रणय खाली कोसळला मात्र त्याला उपचारासाठी नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. इमामवाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. इतके मृत्यू होऊन सुद्धा एक प्रश्न नेहमी उदभवतो सरकारने गुटखा, गांजा व बंदी घातली मात्र या जीवघेण्या नायलॉन मांजावर का नाही?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here