नायलॉन मांजा वापरल्यास होणार तुरुंगवास

0
201

 

पक्षी, प्राण्यांसह नागरिकांच्या जिवालाही धोकादायक ठरणाऱ्या चिनी आणि नायलॉन मांजाच्या विक्रीवर राज्य सरकारने बंदी घातली आहे. मात्र तरीही अशा जीवघेण्या मांजाची छुपी विक्री, वापर आणि साठवणूक केली जात असल्याने पोलिस सतर्क झाले आहे.

परिसरात पत्रके लावून तसेच मेगाफोनद्वारे याबाबत जनजागृती करण्याच्या सूचना सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आल्या आहे. ही बंदी झुगारून नायलॉन मांजाचा वापर करताना कुणी आढळल्यास बंदी आदेश न पाळल्याबद्दल गुन्हा दाखल होऊन तुरुंगवासही होऊ शकतो, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. सक्रांतीच्या काळात पतंगबाजी करताना नायलॉन मांजाचा वापर केल्यास तो जीवघेणा ठरू शकतो. या धोकादायक मांजामुळे या कालावधीत अनेक पक्षी, प्राणी जखमी होतात, तर काही मृत्युमुखी पडतात. त्यामुळे राज्य सरकारने १९८६च्या पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम ५नुसार घातली आहे. तरीही या मांजाची विक्री आणि वापर सर्रास सुरू असतो. अशा विक्रेत्यांवर आणि मांजा वापरणाऱ्या पतंगप्रेमींवर मुंबई पोलिसांची बारीक नजर असेल. आधीच बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांवर संक्रांत कोसळली असताना मांजामुळे पक्ष्यांचे जीव जाऊ नयेत यासाठी खबरदारी घेतली जात आहे. …अन्यथा गुन्हा नायलॉन किंवा चिनी मांजा या मांजाची विक्री व वापरावर बंदी आहे . वापरताना अगर बिक्री करताना कुणी आढळल्यास बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल होईल. हा जामीनपात्र गुन्हा असला, तरी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे एक महिना कारावास किंवा दंड तसेच दोन्ही शिक्षा होऊ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here