वर्धा येथे वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य अधिवेशन

0
200

चंद्रपूर

लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाच्या वृत्तपत्र क्षेत्रातील महत्त्वाचा घटक असणार्या वृत्तपत्र विक्रेत्यांचे राज्य अधिवेशन वर्धा येथे २६ व २७ जानेवारी रोजी होणार आहे, अशी माहिती संयोजक व महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील पाटणकर यांनी दिली. अधिवेशनाच्या बैठका सुरू आहेत. तयारी संदर्भात राज्य कार्यकारिणीची ऑनलाईन बैठक नुकतीच संपन्न झाली. या वेळी सरचिटणीस बालाजी पवार, गोरख भिलारे, विकास सूर्यवंशी, दत्तात्रय घाटगे यांच्यासह राज्य कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते

अधिवेशनबाबत तयारी पूर्ण झालेली आहे. त्यामुळे हे अधिवेशन कोणत्याही परिस्थितीत होणार आहेत. राज्य संघटनेचे सरचिटणीस बालाजी पवार म्हणाले, अधिवेशनात संख्येबाबत बंधन असल्याने या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण करण्याचा विचार सुरू आहे. अधिवेशन स्थळावरून अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण करावे व प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात एखाद्या सभागृहामध्ये अथवा सोयीच्या ठिकाणी वृत्तपत्र विक्रेते व एजंट यांना एकत्रित करून अधिवेशनाचे प्रक्षेपण दाखवण्यात यावे, असा विचार पुढे आला आहे. हे प्रक्षेपण कसे करावे? हे स्थानिक पातळीवर काय नियोजन केले जावे याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. ऑनलाईन बैठकीत कोषाध्यक्ष भिलारे गोरख भिलारे (पंढरपूर), संजय पावशे (मुंबई), विनोद पन्नासे (चंद्रपूर), रवींद्र कुलकर्णी (मालेगाव), सुनील मगर ( नाशिक), संतोष शिरभाते (यवतमाळ), वर्धा येथे या अधिवेशनसंदर्भात अण्णासाहेब जगताप ( औरंगाबाद)

श्री. पाटणकर म्हणाले की, वर्धा व परिसरात अद्यापही कोरोनाची परिस्थिती पूर्ण नियंत्रणात नाही. त्यामुळे अधिवेशनासाठी उपस्थित राहणाऱ्या संख्येवर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. शासकीय नियमांचे पालन करीत व आपल्या सर्व पदाधिकारी विक्रेता बांधवांची काळजी घेत हे अधिवेशन पार पाडावे लागणार आहे. त्यामुळे या अधिवेशनाला संख्येबाबत अधिक महत्त्व न देता बऱ्याच दिवसानंतर आपण एकत्रित येणार असून महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करणार आहोत ही सकारात्मक बाब समजावी. काही प्रश्न प्रलंबित आहेत, त्यावरती चर्चा होऊन पुढील दिशा ठरविली जाईल.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here