पूर्ती सुपर बाजारातून खरेदी केलेल्या गुलाब जामुन मिक्स पावडर मध्ये निघाल्या मोठं मोठ्या अळ्या

0
231

गोंडपीपरी –

समाधान पूर्ती सुपर बाजारातून खरेदी केलेल्या उत्तम कंपनीच्या गुलाब जामुन मिक्स पावडर मध्ये मोठं मोठ्या अळ्या निघाल्यामुळे ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर शहरातील नामांकित बाजारामध्ये असे प्रकार घडत असल्याने चिंता व्यक्त केल्या जात आहे.अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागामार्फत समाधान पूर्ती सुपर बाजाराची सखोल तपासणी करावी अशी मागणी ग्राहक राजकपूर भडके यांनी केली आहे.

दोन दिवसा पूर्वी राजकपूर भडके हे आपल्या कामानिमित्त चंद्रपूरला गेले असता कामे आटोपून परतीच्या मार्गात काही समान खरेदी करिता चंद्रपुरातील जेटपुरा गेट जवळील समाधान पूर्ती बाजारात गेले, व आपल्या मुलाच्या आवडीनुसार त्यांनी तिथून उत्तम नावाचा गुलाब जामुन मिक्स पावडर पाकिट आणि डोनट अश्या दोन वस्तू विकत घेतल्या त्याचे अनुक्रमे 60 आणि 10 एकूण 70 रुपये बिलाचे पैसेही दिले

घरी येऊन दुसऱ्या दिवशी पाकिट फोडून एका ताटामध्ये घेतले असता त्यातून पांढऱ्या तापकीर रंगाच्या अळ्या बाहेर चालायला लागल्या, लागलीच आजूबाजूच्याना बोलावून दाखवलं,सर्वाना जब्बर धक्का बसल्याने आश्चर्य व्यक्त करीत चिंतासुद्धा व्यक्त केली आहे.

यासर्व प्रकरणाबाबत अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त नितीन मोहिते यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत माहिती घेत चौकशी करणार असल्याची माहिती दिली.

एकूणच सुपर बाजाराचे विदर्भात जाळे असलेल्या या समाधान पूर्ती मधील जीवनावश्यक वस्तू नागरिकांना खरंच समाधान देत आहे का? याबाबत शंका निर्माण झाली आहे, स्वस्त माल विकत घेत नागरिकांना सेल स्वरूपात विकणे हेच लक्ष्य समाधान चे दिसत आहे.

यावर सखोल चौकशी करून नागरिकांच्या जीवाशी होणार खेळ प्रशासनाने थांबवायला हवा चंद्रपुरातल्या नामांकित समाधान पूर्ती सुपर बाजारातील विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सर्वच वस्तूच्या दर्जाविषयी त्यांनी शंका व्यक्त केली असून ग्राहकाने सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.अश्या प्रकारच्या वस्तू आरोग्यास हानिकारक असल्याचेही त्यांनी बोलून दाखविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here