पोलिसांची मोहा भट्टीवर धाड :- 254100/- चा मुद्देमाल जप्त

0
174

चंद्रपूर :- ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोजा पायली शिवारात मोहा सडव्याची दारू निघत असल्याची गुप्त माहिती दुर्गापूर पोलिसांना मिळाली. त्याअनुषंगाने दुर्गापूर पोलीस पथकाने गुरुवारी पायली शिवारात कारवाई केली. यावेळी 4 नग प्लास्टिक ड्रम मध्ये 400 लिटर मोहा सडवा किंमत 80000 /- ,700 लिटर मोहा सडवा 140000/-व इतर असा एकूण 254100/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.सदर कार्यवाही दोन ठिकाणी करण्यात आली असून आरोपी नामे मंगेश मधुकर रायपूरे रा.पायली व विशाल कातकर ह्यांना अप क्र.14/21 कलम 65(ई)(फ)म.दा. का.अंतर्गत अटक करण्यात आली.

जिल्ह्यात ६२ ९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला दारूची शक्यता लक्षात घेता दुर्गापूर पोलिस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शना खाली ही कार्यवाही पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सोनोने ,पोशी संतोष आडे, मनोहर जाधव ह्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here