अन्न व औषध प्रशासनातर्फे खाद्य नमुने जप्त

0
170

 

चंद्रपूर, दि. 15 जानेवारी : उत्तम उपहारच्या गुलाब जामुन इंस्टंट मिक्सच्या पॅकेटमध्ये अळ्या आढळल्या या प्रशासनास प्राप्त बातमीची दखल घेण्यात आली आहे. दि. 15 जानेवारी 2021 रोजी अन्न व सुरक्षा अधिकारी प्र.अ. उमप यांनी मे. समाधान मार्केटिंग ॲन्ड कंपनी, जटपुरा गेट, चंद्रपूर या सुपर बाजाराची तपासणी करुन उत्तम उपहार कंपनीच्या गुलाब जामुन इंस्टंट मिक्सचा अन्न नमुना विश्लेषणासाठी घेवून प्रयोगशाळेत पाठविला आहे. प्रशासनामार्फत पुढील योग्य ती कारवाई घेण्यात येत असल्याचे अन्न व औषध प्रशासन चे सहाय्यक आयुक्त नि. दि. मोहिते यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here