धक्कादायक : आम्हाला वोटिंग का केली नाही ? धमकी दिल्यामुळे इसमाची कीटकनाशक पिऊन आत्महत्याचा प्रयत्न

0
2253

घुग्घुस : संपूर्ण महाराष्ट्रात आज मुद्दत संपलेल्या ग्रामपंचायतच्या निवडणूक होत आहेत यात चंद्रपूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीत निवडणूक शांततेने संपन्न झाल्या आहेत मात्र घुग्घुस पासून नजीक असलेल्या बेलसनी गावात मतदान झाल्यानंतर मंगेश लोंढे या इसमाने आपल्या दहा समर्थकां सह वामन झाडे यांच्या घरावर धावा घेत तू आम्हाला निवडणूकीत मदद का केली नाही तसेच आम्हाला मत ही दिले नाही आता तू गावात कसा राहतो ?
असा दम दिल्याने वामन झाडे याने आपल्या जीवाचे हे लोक बरे – वाईट करतील या भीतीने घाबरून कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

झाडे यांनी कीटकनाशके पिल्याचे लक्षात येताच त्यांना तातळीने घुग्घुस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने वैद्यकीय अधिकारी वाकडकर यांनी त्यांना चंद्रपूर येथे रेफेर केले एकीकडे वामन झाडे यांचा जीव वाचविण्यासाठी प्रयत्न होत असतांना मंगेश लोंढे हा राजकीय पक्षांचा कार्यकर्ता असल्याने त्याने आपल्या पक्षाच्या नेत्यांना घुग्घुस पोलीस स्टेशनला नेऊन वामन झाडे यांच्या विरोधातच फिर्याद देण्यासाठी पोहचला या प्रकरणात आता घुग्घुस पोलीस तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here