ज्येष्ठ मार्गदर्शक पत्रकाराला समाज मुकला – आ. किशोर जोरगेवार

0
147


               आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ पत्रकार रामदासजी रायपूरे यांच्या निधणाची बाबती मन हळवे करणारी असून पत्रकारीता क्षेत्रात चार दशकाहून अधिक काम करत पत्रकारीतेच्या माध्यमातून समाजातील सर्वच विषयाला स्पर्श करणारे रामदासजी रायपूरे यांच्या जाण्याने समाज ज्येष्ठ मार्गदर्शक पत्रकाराला मुकला असल्याची शोकसंवेदना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ पत्रकार रामदास रायपूरे यांच्या प्रदिर्घ अशा पत्रकारीतेच्या प्रवासात त्यांनी समाजातील अनेक ज्वलंत विषयाला स्पर्श करत न्याय देण्याचा प्रयत्न केला. आंबेडकर चळवळीतील त्यांचे योगदान समाज कधीही विसणार नाही. लेखनीच्या ताकतीवर अनेक विषयही त्यांनी मार्गी लावले. शासन आणि प्रशासनाच्या कारभारावर त्यांचे बारीक लक्ष असायचे. पत्रकारीतेत येवू पाहत असलेल्यांसाठी ते मार्गदर्शक होते. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्षपदही त्यांनी उत्तम रित्या भुषवले. त्यांच्या जाण्याने पत्रकारीतेसह सामाजीक क्षेत्राचीही हाणी झाली आहे.  रायपुरे परिवाराशी माझे कौटुंबिक संबंध होते त्यामुळे त्यांच्या जाण्याने माझे वैयक्तीकहि नुकसान झाले आहे.  जेव्हा जेव्हा चंद्रपूरच्या पत्रकारीतेचा विषय निघेल तेव्हा तेव्हा रामदासजी रायपुरे यांचे नाव आदराने घेतले जाईल. अशी भावणा सदर शोकसंदेशात आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here