Daily Archives: June 6, 2021

APLICATIONS

यंग चांदा ब्रिगेड आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्षपदी जितेश कुळमेथे

0
चंद्रपूर       आमदार किशोर जोरगेवार अध्यक्ष असलेल्या यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्षपदी जितेश कुळमेथे तर अल्पसंख्याक आघाडी शहर अध्यक्षपदी सलीम शेख यांची नियुक्ती करण्यात आलीआहे. तसेच यावेळी श्रृती लोणारे यांची पशु  पक्षी प्राणी चिकित्सक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे              यंग चांदा ब्रिगेड या सामाजिक संस्थेने मागील काही वर्षात अनेक सामाजिक उपक्रम राबवत सामाजिकक्षेत्रात मोठे नाव केले आहे. या संस्थेच्या माध्यमातून समाजातील  सर्व घटकांना स्पर्श केल्या जात असून गरजूपर्यंत शक्य ती मदत पोहचविल्या जात आहे. संस्थेच्या सुरुवातीच्या काळापासूनच संस्थेशी    जूळून आदिवासी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून धडपड करणारे जितेश कुळमेथे   यांचे कार्य पाहता आता त्यांची नियुक्ती यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी आघाडी जिल्हाध्यक्षपदी करण्यात आली आहे तर सदर संस्थेच्या माध्यमातून अल्पसंख्याकाच्या हक्कासाठी सातत्याने आवाज उचलना-या सलीम शेख यांची नियुक्ती यंग चांदा ब्रिगेड अल्पसंख्याक आघाडी शहराध्यक्षपदी करण्यात आली आहे याच बरोबर श्रृती लोणारे यांची नियुक्ती यंग चांदा ब्रिगेडच्या पक्षु- पक्षी - प्राणी चिकित्सक जिल्हाध्यक्ष म्हणून करण्यात आली आहे. या सर्व नव नियुक्त पदाधिकार्यांना आ. किशोर जोरगेवार यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले असून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी नवनियुक्त पदाधिका-यांसह यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

HOT NEWS

Don`t copy text!